कर्जमाफी बद्दल आजचे मोठे बदल......या योजनेचे नवीन नियम, अटी आणि पात्रता
कर्जमाफी बद्दल आजचे मोठे बदल...... महाराष्ट्र शासनाने ' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ' अंतर्गत नवीन कर्जमाफीचे नियम जाहीर केले आहेत. नुकतीच १० जुलै २०२६ रोजी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांमध्ये अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत. या योजनेचे नवीन नियम , अटी आणि पात्रता खालीलप्रमाणे आहेत: 1. २ लाखांची मर्यादा रद्द : पूर्वी ज्यांचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त होते , त्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आता सरकारने २ लाख रुपयांची ही अट ( Ceiling) पूर्णपणे काढून टाकली आहे. म्हणजेच २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरीही आता पात्र ठरतील. 2. कर्जमाफीची रक्कम : पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची थेट कर्जमाफी दिली जाईल . 3. मुदतवाढ ( Cut-off Date): पूर्वी ही योजना फक्त २०२५-२६ पर्यंतच्या थकीत कर्जासाठी होती. आता ती वाढवून २०२६-२७ या आर्थिक वर्षात थकीत असलेल्या कर्जासाठीही लागू करण्यात आली आहे. 2. जुने शेतकरी पात्र :...