MPSC गट क' अंतर्गत २,६१९ पदांसाठी महाभरती सुरू…

आयोगाने 'महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून याद्वारे विविध विभागांतील एकूण २,६१९ पदांची भरती केली जाणार आहे.
 

एकूण पदे: २,६१९

 लिपिक-टंकलेखक: १,८६४ जागा

 सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क): ४६१ जागा

 कर सहायक: २८२ जागा

 उद्योग निरीक्षक: ९ जागा

 तांत्रिक सहायक: ३ जागा

महत्त्वाच्या तारखा:

पात्र उमेदवारांना २७ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील. भारतीय State Bank मध्ये चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक १९ जुलै पर्यंत असेल. चलनाद्वारे फी भरण्यासाठी २० जुलै २०२६ ही अंतिम मुदत असेल.


📊 परीक्षेचे विविध टप्पे

१. संयुक्त पूर्व परीक्षा: १०० गुण

२. स्वतंत्र मुख्य परीक्षा: ४०० गुण (एकूण २ पेपर)

३. शारीरिक चाचणी व मुलाखत: केवळ पोलीस उप-निरीक्षक (PSI) पदाकरिता ही चाचणी असेल. यामध्ये शारीरिक चाचणी १०० गुणांची तर मुलाखत ४० गुणांची असेल.

४. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गट-क): या पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षेचा हाच अभ्यासक्रम लागू राहील, मात्र त्यांची स्वतंत्र मुख्य परीक्षा ३०० गुणांची असेल.

📝 संयुक्त पूर्व परीक्षा योजना (परीक्षा पद्धत)

विषय: सामान्य क्षमता चाचणी (सांकेतिक क्र. १०६१)

प्रश्नसंख्या: १०० प्रश्न | एकूण गुण: १०० गुण

दर्जा: पदवी (Graduate Level)

माध्यम: मराठी व इंग्रजी

परीक्षेचा कालावधी: १ तास

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQs)


📚 संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

सामान्य क्षमता चाचणी अंतर्गत उमेदवारांना खालील ८ प्रमुख विषयांचा अभ्यास करावा लागेल:

१) इतिहास: आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

२) भूगोल: महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

३) अर्थव्यवस्था:भारतीय अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

४)शासकीय अर्थव्यवस्था: अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

 ५)चालू घडामोडी: जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी.

 ६)राज्यशास्त्र (Polity)

 ७)सामान्य विज्ञान: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) आणि आरोग्यशास्त्र (Hygiene).

८) अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी.

 ९) बुद्धीमापन चाचणी: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.


💻 ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

MPSC च्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:

१. सर्वप्रथम mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in वर जा.

२. जर तुम्ही नवीन युझर असाल, तर 'New User Registration' वर क्लिक करून आपले प्रोफाईल तयार करा.

३. लॉगिन केल्यानंतर 'Online Application' विभागात जाऊन MPSC Group C परीक्षेची लिंक निवडा.

४. सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी) अपलोड करा.

५. तुमच्या प्रवर्गाची परीक्षा फी ऑनलाईन (नेट बँकिंग/कार्डद्वारे) भरा.

६. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MPSC Group B Prelims Exam Result: एमपीएससी गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा निकाल जाहीर.

कल से आगे के ५ दिन का मौसम रिपोर्ट. ( Weather Report )