MPSC Group B Prelims Exam Result: एमपीएससी गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा निकाल जाहीर.
MPSC Big Update: महाराष्ट्र अ-राजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चा कटऑफ जाहीर; ओपन, OBC आणि SEBC चा जनरल कटऑफ ५३.२५ वर
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 'महाराष्ट्र
अ-राजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' (Maharashtra
Non-Gazetted Group-B Services Combined Pre Examination - 2026) चा अधिकृत कटऑफ (Cutoff Marks) जाहीर करण्यात आला आहे. १ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या या पत्रकानुसार, विविध प्रवर्गातील गुणांची अधिकृत यादी समोर आली आहे.
या परीक्षेत ओपन (OPEN), अनुसूचित जाती (SC), भटक्या जमाती (NT-C, NT-D), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) च्या जनरल (General) उमेदवारांसाठीचा कटऑफ
सर्वाधिक म्हणजेच ५३.२५ गुण लागला आहे.
प्रमुख प्रवर्गांचा कटऑफ खालीलप्रमाणे:
ओपन (OPEN): जनरल - ५३.२५, महिला - ५०.२५, क्रीडा - ३१.२५
ओबीसी (OBC): जनरल - ५३.२५, महिला - ५०.२५, क्रीडा - ३१.२५
एसईबीसी (SEBC): जनरल - ५३.२५, महिला - ५०.२५, क्रीडा - ३१.२५
अनुसूचित जाती (SC): जनरल - ५३.२५, महिला - ५०.२५, क्रीडा - २७.००
अनुसूचित जमाती (ST): जनरल - ४३.७५, महिला - ३९.५०, क्रीडा - १५.२५
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): जनरल - ४७.५०, महिला - ४४.००, क्रीडा - २०.००
दिव्यांग आणि अनाथ प्रवर्गाचा कटऑफ:
दिव्यांग (Divyang): ग्रुप ए - ४९.७५, ग्रुप बी - ३८.२५, ग्रुप सी - ५२.७५, ग्रुप डी व ई - ३७.५०
अनाथ (Orphan): ग्रुप ए/बी - २६.५०, ग्रुप सी - ४८.७५
या पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार आता मुख्य
परीक्षेसाठी पात्र असणार.
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित)
सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात
आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
Comments
Post a Comment