MH- SET परीक्षा २०२६ बद्दल मोठे शुद्धीपत्रक....

MH-SET परीक्षा २०२६: राखीव संवर्गाबाबत मोठे शुद्धीपत्रक आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ!



महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी ४१ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक (Corrigendum) प्रसिद्ध केले आहे. यानुसार परीक्षार्थींना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे

🔹 काय आहे शुद्धीपत्रकात

SBC प्रवर्गाचा समावेश-यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहितीपुस्तकात विशेष मागास प्रवर्ग (SBC - Special Backward Class) चा स्वतंत्र उल्लेख राहून गेला होता. नवीन शुद्धीपत्रकानुसार, आता इतर मागासवर्गीय (OBC), भटक्या व विमुक्त जाती-जमाती (VJNT) सोबतच विशेष मागास प्रवर्ग (SBC) (फक्त नॉन-क्रीमी लेअर उमेदवारांसाठी) चा स्पष्ट समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्क रु. ६५०/- आणि विलंब शुल्कासह रु. १,१५०/- लागू असेल. 

महत्त्वाची नोंद: ज्या SBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी इतर प्रवर्गातून अर्ज भरले आहेत, त्यांना त्यांच्या अर्जात संवर्ग दुरुस्ती (Category Correction) करण्यासाठी ८ जुलै ते १० जुलै २०२६ अशी विशेष मुदत देण्यात आली आहे.

जर तुम्ही अजूनही सेट परीक्षेचा फॉर्म भरला नसेल, तर ३ जुलैपर्यंत विनाविलंब शुल्कासह फॉर्म भरण्याची सुवर्णसंधी आहे. शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच आपला अर्ज सबमिट करा!" 

"विशेषतः SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करायला विसरू नका, त्यासाठी विद्यापीठाने ८ ते १० जुलै हा वेळ दिला आहे.

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

MPSC Group B Prelims Exam Result: एमपीएससी गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा निकाल जाहीर.

MPSC गट क' अंतर्गत २,६१९ पदांसाठी महाभरती सुरू…

कल से आगे के ५ दिन का मौसम रिपोर्ट. ( Weather Report )