MPSC चा मोठा निर्णय: आगामी सर्व पूर्व परीक्षा आता ऑनलाइन (CBT) पद्धतीने

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यभरातील स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा बदल केला आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, आगामी काळातील सर्व 'एमपीएससी' पूर्व परीक्षा संगणकाधारित म्हणजेच 'कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट' (CBT) ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. 'महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' ही या नव्या ऑनलाइन पद्धतीनुसार घेतली जाणारी पहिली प्रमुख परीक्षा असणार आहे.

आयोगाची भूमिका: पारदर्शकता आणि जलद निकालांवर भर

आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमवार यांनी मुंबईतील कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ऑनलाइन (CBT) पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. यामुळे भरती प्रक्रियेतील मोठा विलंब टळणार असून उमेदवारांना दिलासा मिळेल. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपालकर व परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख देखील उपस्थित होते.

 

आयोगाने स्पष्ट केलेले प्रमुख मुद्दे:

 

२१ दिवसांत निकाल:

 पूर्व परीक्षांचे निकाल अवघ्या २१ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन आहे.

एक वर्षात भरती पूर्ण:

ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मुलाखत असलेल्या पदांची प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण केली जाईल.

 

फक्त पूर्व परीक्षांसाठी बदल:

हा बदल केवळ 'पूर्व परीक्षांसाठी' लागू असेल. राज्यसेवा, गट '', गट '', किंवा गट '' च्या 'मुख्य परीक्षांच्या' स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Comments

Popular posts from this blog

MPSC Group B Prelims Exam Result: एमपीएससी गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा निकाल जाहीर.

MPSC गट क' अंतर्गत २,६१९ पदांसाठी महाभरती सुरू…

कल से आगे के ५ दिन का मौसम रिपोर्ट. ( Weather Report )