४१ वी महा-सेट परीक्षा आता २७ सप्टेंबरला; CTET परीक्षेमुळे तारखेत बदल!
४१ वी महा-सेट परीक्षा आता २७ सप्टेंबरला; CTET
परीक्षेमुळे तारखेत बदल!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित केली जाणारी ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET) आता २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. मात्र, त्याच दिवशी CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) देखील आयोजित केली गेल्याने उमेदवारांच्या हिताचा विचार करून सेट विभागाने हा निर्णय घेतला आहे.
तारीख बदलण्याचे कारण:
यापूर्वी ७ जुलै २०२६ रोजी जाहीर केलेल्या प्रकटनानुसार सेट परीक्षेची संभाव्य तारीख ६ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली होती. परंतु, याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पूर्वानियोजित असल्याने दोन महत्त्वाच्या परीक्षा एकाच दिवशी येत होत्या. यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती.
या शैक्षणिक अडचणीबाबत विद्यार्थ्यांनी ईमेल व पत्रांद्वारे सेट विभागाकडे परीक्षा ढकलण्याची मागणी केली होती.
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश:
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने विद्यार्थ्यांच्या मागणीची गंभीर दखल घेतली. ६ सप्टेंबर रोजी होणारी सेट परीक्षा आता पुढे ढकलून रविवारी, २७ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
आणखी माहिती साठी येथे https://www.indiaupdates024.com/ click करा.
Comments
Post a Comment