बँकिंग क्षेत्रात करिअरची मोठी संधी! IBPS मार्फत ६,७१५ पीओ (PO) पदांसाठी मेगा भरती सुरू..
बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या तब्बल ६,७१५ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे (जाहिरात क्र. CRP-PO/MT-XVI). या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
पद आणि जागांचा तपशील:
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी
(MT)
एकूण जागा: ६,७१५ पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त
विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे.
वयाची अट: ०१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान
असावे.
(नियमनियमानुसार: SC/ST उमेदवारांना ०५
वर्षे तर OBC उमेदवारांना ०३
वर्षे सूट मिळेल.)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Application Fee): General / OBC उमेदवार: ₹८५०/-
SC / ST /
PWD उमेदवार: ₹१७५/-
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ जुलै २०२६
पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ऑगस्ट २०२६
मुख्य परीक्षा (Main Exam): ऑक्टोबर २०२६
अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन
ऑनलाईन (Online) पद्धतीने आपले
अर्ज सादर करायचे आहेत. अधिक माहिती आणि सविस्तर जाहिरातीसाठी उमेदवार ने Ibps च्या अधिकृत
संकेतस्थळाला भेट द्या.
Comments
Post a Comment