IBPS मार्फत ७४५ 'स्पेशालिस्ट ऑफिसर' पदांची मेगा भरती जाहीर; २१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी!
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन' (IBPS) मार्फत 'स्पेशालिस्ट ऑफिसर' (CRP SPL-XVI) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे विविध विभागांमध्ये एकूण ७४५ जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना २१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
विविध पदांचा तपशील
आणि जागा:
या मेगा भरतीमध्ये
खालीलप्रमाणे विविध स्पेशालिस्ट ऑफिसर (स्केल I) पदांचा समावेश आहे:
आयटी ऑफिसर (IT Officer - Scale I): ३०१ जागा
ॲग्रीकल्चरल FIELD ऑफिसर (Agricultural Field Officer): १९० जागा
राजभाषा अधिकारी (Scale I): ८९ जागा
लॉ ऑफिसर (Scale I): १०५ जागा
एचआर/पर्सोनेल ऑफिसर
(Scale I): ६० जागा
मार्केटिंग ऑफिसर (Scale I): ०० जागा
एकूण जागा: ७४५
शैक्षणिक पात्रता:
आयटी ऑफिसर (पद क्र.
१): B.E./B.Tech
(Computer Science / Computer Applications / Information Technology /
Electronics / Electronics & Telecommunications / Electronics &
Communication / Electronics & Instrumentation) किंवा कॉम्प्युटर
सायन्स/आयटी मधील पदव्युत्तर पदवी.
ॲग्रीकल्चरल फील्ड ऑफिसर
(पद क्र. २): कृषी, फळबाग, पशुपालन, पशुवैद्यकीय
विज्ञान, दुग्धशाळा
विज्ञान, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि
सहकार, बँकिंग, कृषी-वानिकी, वानिकी, कृषी
जैवतंत्रज्ञान, अन्न विज्ञान, शेती व्यवसाय
व्यवस्थापन, अन्न तंत्रज्ञान, डेअरी तंत्रज्ञान
किंवा शेती अभियांत्रिकी मधील पदवी.
राजभाषा अधिकारी (पद
क्र. ३): इंग्रजी विषयासह हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी.
लॉ ऑफिसर (पद क्र.
४): विधी पदवी (LLB).
एचआर/पर्सोनेल ऑफिसर
(पद क्र. ५): पदवीधर आणि पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन /
मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा यामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा
डिप्लोमा.
मार्केटिंग ऑफिसर (पद
क्र. ६): पदवीधर आणि MMS
(मार्केटिंग) / MBA (Marketing) / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM पदवी.
वयाची अट आणि परीक्षा
शुल्क:
वयोमर्यादा: ०१ जुलै
२०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांसाठी ०५
वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ०३ वर्षे शिथिलता देण्यात आली आहे.)
परीक्षा शुल्क:
सर्वसाधारण (General) आणि ओबीसी
उमेदवारांसाठी ८५०/- रुपये,
तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी
१७५/- रुपये शुल्क आहे.
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारत.
महत्त्वाच्या तारखा
लक्षात ठेवा:
ऑनलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख: २१ जुलै २०२६
पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ऑगस्ट २०२६
मुख्य परीक्षा (Main Exam): नोव्हेंबर २०२६
इच्छुक उमेदवारांनी अधिक
माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Comments
Post a Comment